भरली वांगी-Stuffed Baingan

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी

साहित्य :
४ छोटी वांगी
बटाट्याच्या ६-७ मध्यम आकाराच्या फोडी
१  मध्यम कांदा  उभा चिरून
४ टेबलस्पून सुकं खोबरं
१ १/४ टीस्पून गोडा मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१/४  टीस्पून हळद
१ १/४  टीस्पून चिंचेचा कोळ
१ १/२ टेबलस्पून किसलेला गूळ
मीठ चवीप्रमाणे
४  टेबलस्पून तेल

कृती :
१. वांगी धुवून त्यांचे देठ आणि काटे  काढून टाका आणि अधिक चिन्हात ३/४ भागापर्यंत चीर देऊन कापून घ्या. वांग्यांना मीठ लावून ठेवा. बटाट्याची सालं काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा आणि पाण्यात घालून ठेवा म्हणजे बटाटा काळा पडणार नाही.
२. एक टेबलस्पून तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं, गोडा मसाला, लाल तिखट, हळद घालून डार्क ब्राऊन होई पर्यंत खमंग भाजून घ्या. त्यात चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घाला. आणि मिक्सरवर  थोडसं गरम पाणी घालून बारीक वाटून घ्या. मसाला जाडसर राहील इतकेच पाणी घाला. चव घेऊन बघा.
३. बारीक वाटलेला मसाला प्रत्येक वांग्यात अलगद भरा. उरलेला मसाला बाजूला ठेऊन द्या. कढईत तेल गरम करा आणि त्यात मसाला भरलेली वांगी सोडा. झाकण ठेऊन २-३ मिनिटे वांगी थोडी वाफवून घ्या.
नंतर बटाट्याच्या फोडी आणि उरलेला मसाला घालून अलगद परता. गरज वाटल्यास १/४ कप पाणी घाला. आणि झाकण ठेऊन  १०-१५ मिनिटे बटाटा आणि वांगी शिजवत ठेवा.
४. मध्ये मध्ये अलगद परता. म्हणजे तळाला लागणार नाही. काटा चमच्याने टोचून बटाटा शिजल्याची खात्री करा. आणि गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.

टीप: भरले वांगे मसालेदार असल्यामुळे  बरोबर भात केल्यास साधे वरण किंवा तोय चांगले लागते.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!