कोलंबीचं दबदबीत-Prawn Masala

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य :
१०-१५ कोलंबी
१ कप कांदा बारीक चिरून
१ कप खवणलेलं ओलं खोबरं
१ टीस्पून धने
२ चिमुट मिरपूड  
१ टीस्पून लाल तिखाट
१/४ टीस्पून हळद
३ -४ लसूण पाकळ्या
२-३ सोलं   (आमसुलं)
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल

कृती:
१. कोलंबीचा  काळा धागा आणि कवच काढून कोलंबी साफ करून घ्या. आधीच साफ केलेली कोलंबी असेल तर धागा ब-याचदा काढलेला असतो.
२. ओलं खोबरं, धने आणि मिरपूड मिक्सरवर किंचित गरम पाणी घालून बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात तेल गरम करा आणि लसूण बारीक चिरून फोडणीला घाला.लसूण गोल्डन ब्राऊन झाली कि कांदा घालून ४-५ मिनिटे परता.
४. लाल तिखट,हळद आणि कोलंबी घालून परता. कोलंबी ५-७ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. नंतर वाटलेला मसाला आणि सोलं घाला.१/२ कप पाणी  घालून परता.
५. झाकण ठेवून कोलंबी नीट शिजवा. नंतर वरून कोथिंबीर पेरून सोलकढी आणि भाताबरोबर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!