तिस-या मसाला-Spicy Mussels Masala

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी


साहित्य : 
१ kg तिस-या (अंदाजे ४०-५० शिंपले )
१ मध्यम कांदा उभा चिरून
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
४ टेबलस्पून सुकं खोबरं
१ टेबलस्पून ओलं खोबरं
खडा मसाला ( ३लवंगा, ३-४ काळी मिरी, १" दालचिनीचा तुकडा, २ वेलची)
१/२ टीस्पून शहाजिरे/जिरे
१ टीस्पून धने
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
२-३ आमसुलं
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल

कृती :
१. तिस-या स्वच्छ धुवून तासभर फ्रीझर मध्ये ठेवा म्हणजे बाहेर काढल्यावर जरा वेळानी त्या आपोआप उघडतील.
२.तिस-या साफ करताना उघडलेले शिंपल्यांची एक बाजू माष्टा सकट तशीच ठेवा. दुस-या बाजूला लागलेले माष्टं काढून घ्या आणि तो शिंपला फेकून द्या.
३. अर्धे शिंपले माष्टं पूर्ण काढून घेऊन फेकून द्या. काही वेळेला शिंपल्यांच्या आतमध्ये छोटे खेकडे असतात ते काढून फेकून द्या.
४. फेकून द्यायला ठेवलेले शिंपले १ कप पाण्यात धुवून ते पाणी वापरण्यासाठी बाजूला ठेवा.
५. कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून कांदा गोल्डन ब्राऊन होई पर्यंत परता. त्यात खडा मसाला, धने, शहाजिरे, हळद, लाल तिखट ,सुकं खोबरं ब्राऊन होऊ पर्यंत खमंग परतून घ्या. नंतर त्यात ओलं खोबरं घालून परता. मिश्रण थंड झाल्यावर थोडंसं गरम पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
६. त्याच कढईत तेल गरम करा आणि १/२ कप बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.त्यात वाटलेल्या मसाल्यातलं अर्धा मसाला घालून परता. मग साफ करून ठेवलेल्या तिस-या घालून परता. झाकण ठेवून एक उकळी काढा. उरलेला मसाला आणि आमसुलं घालून नीट मिक्स करा. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवत ठेवा.
७. शिंपले समुद्रातले असल्याने आधीच खारट असतात त्यामुळे चव बघून गरज वाटली तरच मीठ घाला. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.
८. तिस-यांबरोबर साधा भात आणि सोलकढी म्हणजे फारच छान ! 

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!