मुगा गाठी-Muga Gathi

मुगा गाठी हा पदार्थ हिरवे मुग आणि ओलं खोबरं वापरून करतात. गोव्याकडचा हा एकदम प्रसिद्ध शाकाहारी पदार्थ आहे. कोकणी लोकांच्या लग्नात मुगा गाठी खास केली जाते.

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी


साहित्य : 
३ कप मोड आलेले मुग
१ कप ओलं खोबरं
७-८ ओले काजू
४-५ खोब-याची कापं
१ टीस्पून धने
१ टीस्पून लाल तिखट
१ हिरवी मिरची
१/२ टीस्पून साखर
मीठ चवी प्रमाणे
फोडणीसाठी-
१ टेबलस्पून तेल
४-५ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग

पूर्व तयारी : हिरवे मुग ९ -१० तास भिजत घाला आणि नंतर चाळणीत उपसून ठेवा. १०-१२ तासांनी त्याला लांब मोड येतील.
मोड आलेले मूड पाण्यात भिजत घाला १-२ तासांनी त्याची सालं वर येतील. सगळी सालं काढून टाका. आणि उरलेले पांढरे मुग घ्या.

कृती : 
१. हिरवी मिरची घालून मुग कुकरमधून शिजवून घ्या. कुकरची एकच शिट्टी काढा नाहीतर मुग जास्ती शिजतील.
२.ओले काजू पाण्यात १/२ तास भिजत घाला. नंतर त्याची सालं काढून टाका.
२. धने भाजून घ्या. त्यात ओलं खोबरं आणि लाल तिखट घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
३. शिजलेल्या मुगात हा मसाला, साखर,मीठ, ओले काजू आणि खोब-याचे काप आणि १ कप पाणी घालून उकळा.
४. हिंग मोहरी आणि कढीपत्त्याची वरून फोडणी द्या.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!