साहित्य :
१/४ Kg तिलपिआ मासा
१/४ कप नारळाचं दुध
१ कप उभा चिरलेला कांदा
१/२ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
३-४ पाकळ्या लसूण
आल्याच्या ३" लांब स्टिक्स (उभे पात्तळ चिरलेले आले)
१ टीस्पून चिंचेचा कोळ
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ हिरवी मिरची
१/४ टीस्पून आमचूर
मीठ चवीप्रमाणे
कृती :
१. माशाचे साधारण २" x २" आकाराचे तुकडे करा आणि त्याला हळद तिखट मीठ चिंच लावून १५ मिनिटे मॅरीनेट करून ठेवा.
२.पातेल्यात तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. कांदा गुलाबी झाला कि लसूण (उभी चिरून )आणि आल्याच्या स्टिक्स, हिरवी मिरची (उभी चिरून) घालून परता.
३. २-३ मिनिटांनी भोपळी मिरची घालून परता. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा.भोपळी मिरची थोडी अर्धी कच्ची राहू दे पूर्ण शिजवू नका. आमचूर आणि लाल तिखट घाला.कांदा आणि भोपळी मिरची पुरतच मीठ घाला.
४. १/२ कप नारळाचा दुध घाला.(रेडीमेड कोकोनट मिल्क असेल तर २ टेबलस्पून कोकोनट मिल्क आणि १/४ कप पाणी घाला.)
५. मॅरीनेट केलेले माशाचे तुकडे घालून तुकडे मोडणार नाहीत इतके अलगद परता आणि झाकण ठेवून ५ मिनिटे उकळत ठेवा. मासे लगेच शिजतात.
६. वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!