साहित्य :
१ १/२ कप ताज्या अननसाच्या फोडी
२-३ चेरीचे तुकडे
२ कप दही
३ टीस्पून साखर
कृती :
१. पातेल्यात अननसाच्या फोडींना १ टीस्पून साखर लावून ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. मायक्रोवेव ओव्हन असेल तर त्यात १ मिनिट ठेवून शिजवाव्यात.
२. बाउल मध्ये दही घोटून घ्या. त्यात २ टीस्पून साखर आणि चेरीचे तुकडे घाला. साखर विरघळेपर्यंत मिक्स करा.
३. शिजवलेल्या अननसाच्या फोडी थंड झाल्यावर घाला. गरम फोडी घातल्या तर दही आंबट आणि पात्तळ होण्याची शक्यता असते. रायतं फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!