सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य:
१/२ कप वाफवलेले मटार
५० ग्रॅम पनीर
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टोमॅटो बारीक चिरून
४-५ काजू
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून गरम मसाला
१/४ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१.पनीरचे चौकोनी तुकडे करून तेलावर गोल्डन ब्राऊन रंगावर जेमतेम शालो फ्राय करून घ्या.म्हणजे पनीर ग्रेवीत घातल्यावर मोडणार नाही. डीप फ्राय करू नका त्यामुळे पनीर मधले प्रोटीन्स कमी होतात.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि त्यात काजू तळून घ्या. काजू बाजूला काढून ठेवा आणि त्या तेलात आलं-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परता मग कांदा फोडणीला घाला. कांदा गोल्डन ब्राऊन झाला कि टोमॅटो, हळद ,तिखट घालून तेल सुटे पर्यंत परता. मिश्रण थंड झालं कि काजू घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करा आणि मिक्सर मधले वाटण तेलावर परतून घ्या. त्यात धने-जिरे पूड, गरम मसाला घाला. वाफवलेले मटार आणि १/२ कप पाणी घालून उकळी काढा.
४. शालो फ्राय केलेले पनीर घालून अलगद ढवळा. झाकण ठेवू १ वाफ काढा. आणि कोथिंबीर पेरून नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.

I liked your blog. You have taken lots of efforts. I have 2 queries.
ReplyDelete1) How to make tomato puree at home?
2) How to make hotel style gravy at home for punjabi dishes?