A most popular Konkani curry cooked with onion pakode and coconut milk
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य:
गोळ्यासाठी-
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
कांद्यातमावेल इतके बेसन (अंदाजे ४ टेबलस्पून)
मीठ चवीप्रमाणे
आमटी साठी-
३ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
१/२ कप पाणी
१/२ कप नारळाचं दुध
१ १/२ टीस्पून बेसन
१/२ टीस्पून गोडा मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
२ टीस्पून गूळ
१-२ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१. कांदा बारीक चिरून त्यात हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि मावेल इतपत बेसन घाला. पाण्याचा हात लावून मिश्रण कालवून घ्या.मिश्रण चिकटसर असले पाहिजे. जास्ती पाणी घालू नका.
२.पातेल्यात तेल गरम करा आणि कांदा फोडणीला घाला. कांदा गोल्डन ब्राऊन झाला कि हळद, तिखट, गोडा मसाला घालून परता.
३. पाणी, चिंचेचा कोळ आणि नारळाचं दुध घालून उकळी काढा. १/४ कप पाण्यात बेसन (गुठळ्या होऊ न देता) मिक्स करा आणि आमटीत घालून २-३ मिनिटे उकळा.
४. बेसन लावल्यामुळे आमटीला जाडसरपणा येईल. आमटी उकळली कि गोळ्यासाठी केलेले मिश्रण चार बोटात घेऊन (१ टेबलस्पून मापाने) अलगद आमटीत सोडा. गोळे सोडताना प्रत्येक गोळ्यात अंतर ठेवा. झाकण ठेऊन २-३ मिनिटे उकळत ठेवा. गोळ्यामुळे आमटीला जास्ती जाडसरपणा येईल.
५ .वरून कोथिंबीर पेरून भाताबरोबर सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!