पनीर चिली -Paneer chilli Dry

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
२०० ग्रॅम ताजे पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
१ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ लसूण पाकळ्या चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
 १ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून  मिरपूड
१/४ कप डार्क सोया सोस
३  टेबलस्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीप्रमाणे
१ चिमुट अजिनोमोटो
तेल

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
३. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
४. पनीरचे तुकडे घालून परता.
५. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी,  ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर  होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच Serve करा.

5 comments:

  1. hello kalyani,
    thanks hi recipe sangitalya baddal, me karun pahili ani khup chan zali ahe.......

    love,
    prachi ranade

    ReplyDelete
  2. hi prachi,

    Thanks :)dusri kuthli navin recipe try kelis ki nakki kalav kashi zali hoti te.

    ReplyDelete
  3. hey hi....
    mi tujhya recipe pramne paneer aivaji idli use keli..aani ti sudha mast jhali..
    mala hi recipe print kadhun thevayachi aahe..
    so can pls mail me..??
    mail id : kadambari.1986@gmail.com

    ReplyDelete
  4. Hi kadambari,
    Paneerchya ivaji idli vaparnyachi idea ekdum zakkas!! :)
    tu control+P vaprun page print karu shakates...fakt CTRL key ani P key ekatra press kaar ani tula print option milel....Blog Page chya bottom la sudhha print option aahe...Jar print hot nasel tar kalav....Mi tula email karen :)

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!