सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य:
१ जुडी कांद्याची पात
१/२ कप बेसन
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
३-४ कढीपत्ता पाने
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल
कृती:
१. कांद्याची पात आणि खालचे कांदे बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत तापलं कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि हिंग आणि कढीपत्ता पाने घाला.आणि कांद्याची आत आणि पातीचे कांदे दोन्ही एकत्र फोडणीला घाला आणि १-२ मिनिटे परतून घ्या. हळद तिखट आणि मीठ घाला.१-२ मिनिटे परता.
२. पातीला थोडं पाणी सुटलं कि, वरून बेसन चमच्याने घाला. १ चमचा घालून परता मग पुन्हा १ चमचा बेसन घालून परता असे सगळे बेसन हळू हळू घालून १ टेबलस्पून तेल सगळ्या बाजूने थोडं थोडं करून सोडा. आणि ४-५ मिनिटे खरपूस परतून घ्या. गरम झुणका पोळी बरोबर सर्व्ह करा.
टीप: कांद्याची पात फोडणीला घातली कि किंवा बेसन घातल्यावर वरून झाकण ठेवू नका.नाहीतर झुणका बुळबुळीत होईल.कांद्याची पात पटकन शिजते, त्यामुळे वरून झाकण ठेवून शिजवावी लागत नाही.
झुणका भरपूर परतून घ्या. म्हणजे चिकट होणार नाही.गरज वाटल्यास तेल थोडे जास्ती घ्या.
Can you make this the day before?
ReplyDeleteThanks
Yes of course! you can..
ReplyDeletechaan aahe recipe
ReplyDeleteaajach try karen