Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य :
२-३ भजीच्या मिरच्या (४"-५" लांब)
सारणासाठी-
३ टेबलस्पून दाण्याचा कुट
२ टेबलस्पून ओलं खोबरं
१ टीस्पून सुकं खोबरं
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१ १/२ टीस्पून साखर
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून पांढरे तीळ
३ टेबलस्पून बेसन
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीप्रमाणे
शालो फ्राय करण्यासाठी ३ टेबलस्पून तेल
कृती :
१. भजीच्या मिरचीचा देठा कडचा भाग सुरीने कापून टाका म्हणजे मिरचीच्या आत सारण भरता येईल. मिरचीचा आतला भाग आणि बिया छोट्या सुरीने किंवा चमच्याच्या दांड्याने काढून टाका. मिरची आतून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. सगळ्या बिया पूर्ण गेल्यात याची खात्री करून घ्या.
२. सारणासाठी, एका बाउल मध्ये साहित्यात दिलेलं सगळं सामान एकत्र करून कालवून घ्या. किंचित पाण्याचा ओलसर हात लावून घ्या. सारण एकदम घट्ट पाहिजे पण सुकं नको. चव घेऊन मीठ - साखर बरोबर वाटल्यास सारण मिरचीत बोटाने दाबून खालपासून वरपर्यंत भरा.
३. एका खोलगट तव्यावर तेल गरम करा. आणि वरून मिरच्या घालून परता. झाकण ठेवून मिरच्या शिजू द्या.मध्ये मध्ये झाकण काढून मिरच्या फिरवा. म्हणजे सगळ्या बाजूने शिजल्या जातील. मिरचीला काळे डाग पडतील. मिरचीचा रंग बदले पर्यंत मिरच्या शिजवू नका.
४.दही भात किंवा पोळी बरोबर या मिरच्या सर्व्ह करा.
टीप : मिरच्या जास्ती लांब असतील तर सारण भरून फ्राय केल्यावर सर्व्ह करताना सुरीने तुकडे करून द्या.
टीप : मिरच्या जास्ती लांब असतील तर सारण भरून फ्राय केल्यावर सर्व्ह करताना सुरीने तुकडे करून द्या.
मिरच्यांच्या आकाराप्रमाणे अंदाज घेऊन सारण कमी जास्त प्रमाणात तयार करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!