फ्रेंच टोस्ट- French Toast

Read this recipe in English
Servings : 2 Persons

साहित्य:
४ ब्रेडचे स्लाइस
२ अंडी 
४ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून विनेगर
१ टेबलस्पून चीज 
१ हिरवी मिरची
१ चिमुट मिरपूड
१ टेबलस्पून बटर

कृती :
१. अंडी फोडून फेटून घ्या.त्यात कांदा हिरवी मिरची (बारीक चिरून),मिरपूड , विनेगर, चीज ,हळद आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
२. ब्रेडच्या स्लाइसवर चमच्याने मिश्रण पसरावा. तव्यावर १ टीस्पून बटर गरम करा. आणि ज्या बाजूला अंड लावलय ती बाजू   तव्यावर टाकून १- २ मिनिटे फ्राय करा. ती बाजू फ्राय होताना स्लाइस च्या दुस-या  बाजूला वरून अंड्याचे मिश्रण चमच्याने  लावा. खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाली कि स्लाइस उलटी करून ती बाजू फ्राय करा. बाजूने थोडं बटर सोडा.
३. स्लाइसच्या दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय करून फ्रेंच टोस्ट टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

2 comments:

  1. Mala khupach awadli hi French Toast chi idea....
    Thnx....asech chan chan padartha upload kara...!!!
    - Ankita

    ReplyDelete
  2. chanacha aahe..

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!