स्वीट अंड सोर वेजी आणि कोलंबी -Sweet and sour Veggie with Prawn

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 

साहित्य : 
१ कप उभा चिरलेला कांदा
१/४ कप गाजराचे २" लांबीचे तुकडे
१/२ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ कांद्याची पातीचे देठ
१/२ कप कांद्याची पात बारीक चिरून
९-१० (साफ केलेली) कोलंबी
३-४ लसूण पाकळ्या
२" आल्याचे उभे तुकडे
१ चिमुट अजिनोमोटो
१ टेबलस्पून शेजवान सॉस
३ टेबलस्पून टोमॅटो केचप
१ टेबलस्पून सोया सॉस
१ १/२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/४ कप तेल

कृती:
१.१/४ कप पाण्यात १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, १ टीस्पून शेजवान सॉस, १/४ टीस्पून मीठ घालून गुठळ्या होऊ न देता मिक्स करा. त्यात कोलंबी बुडवून तेलावर शालो फ्राय करून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. नंतर आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून घाला. मग लगेचच भोपळी मिरची आणि गाजर घालून परता.
३. १ टीस्पून शेजवान सॉस,३ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टेबलस्पून सोया सॉस ,अजिनोमोटो आणि भाज्यांपुरतेच मीठ घाला. भाज्या नीट परतून झाकण ठेवून अर्धवट शिजवा. कांद्याच्या पातीचे देठ आणि फ्राय केलेली कोलंबी घालून परता.
४. सॉस साठी एका छोट्या भांड्यात १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टीस्पून शेजवान सॉस,१ टीस्पून साखर, १/४ टीस्पून मीठ घालून १ १/२ कप पाणी घाला आणि गुठळ्या होऊ न देता नीट मिक्स करा. आणि उकळायला ठेवा. एकीकडे सतत ढवळत राहा. उकळी आल्यावर सॉस जाडसर होईल. मग लगेच परतलेल्या भाज्यांवर वरून ओता आणि मिक्स करा.शेवटी वरून कांद्याची पात घालून फ्राईड राइस बरोबर सर्व्ह करा.

1 comment:

  1. helo tumchya receipe khupch chan ahet
    me nonveg chya receipe karun pahilya khup chan zalya hotya ghari sarvana avdlya
    thank u so much
    plz mala kadai chiken chi receipe sangal ka

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!