हराभरा कबाब-Harabhara Kabab

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी


साहित्य:
४ मध्यम उकडलेले बटाटे
१/४ कप भिजवलेली चण्याची डाळ (डाळ ६-७ तास आधीच भिजवून ठेवा)
३ कप बारीक चिरलेला पालक(१ जुडी पालक)
२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
३  हिरव्या मिरच्या वाटून  
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१ टेबलस्पून चाट मसाला
१ चिमुट गरम मसाला  
ब्रेडचे ५-६ स्लाइस
३ टेबलस्पून तांदळाचं पीठ
२-३ टेबलस्पून तिळ वरून लावण्यासाठी
मीठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल

कृती:
१. उकडलेले बटाटे किसून घ्या.त्यात बारीक चिरलेला पालक,आलं-लसूण पेस्ट,हिरव्या मिरचीची पेस्ट,धनेपूड ,जिरेपूड,चाट मसाला,गरम मसाला आणि मीठ घालून कालवून घ्या. डाळ खसखशीत वाटून घ्या आणि पालकाबरोबर बटाट्यात मिस्क करा.
२.ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून काढून बारीक करून घाला.सगळा मिश्रण पुन्हा नीट कालवून एकजीव करा.पालकामुळे मिश्रणाला हिरवा रंग येईल.
३.मिश्रणाचे साधारण २" आकाराचे गोळे करून चपटे करा. एका ताटलीत तिळ घ्या आणि गोळा दोन्ही बाजूने तिळावर लावा.म्हणजे त्याला तिळ चिकटतील.
४.गोळ्याला  तांदळाच्या पिठाचा हात लावून तेलात ब्राऊन रंग येई पर्यंत डीप फ्राय करा. गरम गरम कबाब केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

7 comments:

  1. Harbhara Dal kadhi use karaychi?

    ReplyDelete
  2. sorry Rohini post madhe he mension karaycha rahila hota. palaka barobarach dal thodi khaskhashit vatun ghala. dalimule kababla mastta chav yete :)

    ReplyDelete
  3. Hi Kalyani..
    Thanks a lot. Actually me kalach harbhara Dal bhijat ghatli hoti, aaj ghari gele ki karen Harbhara Kabab, ani udya sangen kase jhale te. Recipe khupach simple and chan aahe.keep it up !!

    ReplyDelete
  4. thats really nice :) nakki kalav. thanks Rohini

    ReplyDelete
  5. palak pan vadun ghetala tar chalel ka

    ReplyDelete
  6. Brede che slice mhanje akkha bread ki side che brown

    ReplyDelete
  7. mi karun pahili hi dish khup sopi aani chan aahe. mi tuja saglya recipe krun pahilya saglyach recipe khup sopya aahet. khupch chan

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!