Servings : 6 Persons
साहित्य :
१ कप शेवया
७ कप दुध
४ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स मिल्क
१ टीस्पून तूप
१/४ टीस्पून वेलची पूड
१ चिमुट केशर
१/४ कप बदामाचे कप
१/४ कप बेदाणे
कृती:
१. पातेल्यात तूप गरम करा आणि तुपावर शेवया गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्या. शेवया लांब असतील तर भाजताना चुरडून घ्या.(अंदाजे १/२"-१" लांबी ठेवा.)
२. दुस-या पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
३. आटवलेले दुध भाजलेल्या शेवयांमध्ये घालून मिक्स करा. स्वीटंड कंडेन्स मिल्क घालून ढवळा आणि खीर शेवया शिजे पर्यंत उकळत ठेवा.
४.बदाम आणि बेदाणे घाला.एकीकडे सतत ढवळत रहा. शेवया पूर्ण शिजल्यानंतर वेलची पूड आणि केशर घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
५.स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.खीर गार झाली कि फ्रीज मध्ये ठेवून थंड Serve करा.
टीप: स्वीटंड कंडेन्स मिल्क नसेल तर दुध आटवून एकूण प्रमाणाच्या निम्मे करावे आणि चवीप्रमाणे साखर घालावी.
why u use sweetend condence milk
ReplyDelete