सर्व्हिंग: साधारण १ कप चटणी होईल
साहित्य:
३ टेबलस्पून चिंच
५ टेबलस्पून किसलेला गुळ
१/२ टीस्पून लाल तिखट
१ खजूर
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१. चिंच १/४ कप पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. चिंच पूर्ण भिजली कि त्यातच बोटांनी दाबून दाबून त्याचा सगळा गर (कोळ) पाण्यात काढा.
चिंच हाताने घट्ट पिळून काढा. कोळ असलेले पाणी गाळण्याने गाळुन घ्या. नवीन पाणी घ्या. पुन्हा तीच चिंच त्यात बुडवून कोळ काढा. असे २-३ वेळा करा म्हणजे चिंचेचा सगळा कोळ निघून चोथा उरेल.चोथा फेकून द्या.
२.चिंचेचा कोळ गाळण्याने गाळुन घ्या. त्यात एक खजूर (बी काढून) कुस्करून घाला.मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या.
३. मिश्रणात धने-जिरेपूड,गुळ,लाल तिखट आणि मीठ घाला. ढवळून मिश्रण गॅस वर उकळत ठेवा. मिश्रण २-३ मिनिटे उकळल कि ते जाडसर होईल.
४. चटणी पूर्ण गार झाली कि चाट किंवा कुठल्याही कुरकुरीत स्नॅक्स बरोबर खायला द्या.
टीप: चटणी उकळल्यामुळे जास्ती टेस्टी लागते शिवाय २०-२५ दिवस फ्रीज मध्ये टिकते.चटणी जास्ती प्रमाणात आधीच करून ठेवली कि आयत्यावेळेस उपयोगी येते.
very nice, i have introduced this site to my wife
ReplyDeletewaw............
ReplyDeletethanx
ReplyDelete