साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
भोपळी मिरचीचे ५-६ चौकोनी तुकडे
कांद्याचे ७-८ चौकोनी तुकडे
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ जुडी पुदिना
१ कप कोथिंबीर
२०० ग्रॅम पनीर
भोपळी मिरचीचे ५-६ चौकोनी तुकडे
कांद्याचे ७-८ चौकोनी तुकडे
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ जुडी पुदिना
१ कप कोथिंबीर
१/४ टीस्पून हळद
४-५ काजू
४-५ काजू
१/४ टीस्पून आमचूर
२-३ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१/२" आले
३ टेबलस्पून घट्ट दही
१ टीस्पून बेसन
१/४ टीस्पून धणेपूड
२-३ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१/२" आले
३ टेबलस्पून घट्ट दही
१ टीस्पून बेसन
१/४ टीस्पून धणेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१/४ टीस्पून चाट मसाला
१/४ टीस्पून गरम मसाला
मीठ चवीप्रमाणे
४-५ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून बटर
कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. आलं ,लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून पेस्ट करून घ्या. पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर मिक्सरवर बारीक वाटून ठेवा.
२. ३ टेबलस्पून दह्यात, १ चिमुट हळद, १ टीस्पून बेसन,१/४ टीस्पून धने-जिरेपूड,१/२ टीस्पून आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट,१ चिमुट गरम मसाला आणि मीठ घालून चमच्याने घोटून घ्या.
३. 300°F तापमानाला ओव्हन preheat करून घ्या. मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून बेकिंग ट्रे मध्ये अरेंज करा. पनीर वरून चमच्याने थोडे बटर पात्तळ करून सोडा आणि एकूण १५-२० मिनिटे ग्रील करा. १० मिनिटांनी पनीर उलटवा आणि आणखीन ५-७ मिनिटे ओव्हन मध्ये ठेवा. पनीरला लाईट ब्राऊन रंग आला म्हणजे ते ग्रील झाले असे समजावे. ओव्हन नसेल तर पनीरचे तुकडे थोड्याश्या तेलात (मॅरीनेट न करता नुसतेच) शालो फ्राय करा. मॅरीनेट करायचा बाकीचा मसाला ग्रेवी करताना त्यातच घाला.
४. पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा त्यात काजू तळुन घ्या. उरलेल्या तेलात उभा चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात उरलेली आलं- लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट आणि हळद घालून परता. ३-४ मिनिटे परतल्यावर ,सगळे मिश्रण आणि तळलेले काजू मिक्सर मधून काढून बारीक पेस्ट करून घ्या.
५. पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात कांद्याचे वाटण , भोपळी मिरची आणि कांद्याचे तुकडे घालून परता. झाकण ठेवून भोपळी मिरची शिजवा. नंतर पुदिना-कोथिंबीरीचे वाटण घालून परता. १/४ टीस्पून गरम मसाला, आमचूर ,मीठ घाला.२-३ मिनिटे परतून अर्धा कप पाणी घाला.एक उकळी काढा. ग्रील केलेले पनीरचे तुकडे घालून अलगद परता आणि गॅस लगेच बंद करा. झाकण ठेवा. वाफ २-३ मिनिटे मुरु द्या.
६. पराठा, नान किंवा राईस बरोबर सर्व्ह करा.

delicious indeed! i want to try it
ReplyDeleteKruti vachtana jara confusion hot ahe... Jar ha padarth gas var karat asu, tar dahi besanacha mishran nakki kadhi ghalaycha ahe..
ReplyDelete