पालकाचा परोठा-Palak Paratha

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४-५ परोठे

साहित्य:
१ कप गव्हाचं पीठ
२ कप बारीक चिरलेला पालक
१/२" आले
२-३ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
२ टीस्पून तिळ
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून जिरेपूड
२ टेबलस्पून कोथिंबीर
१/२ टीस्पून साखर
१ टीस्पून मीठ
२ टीस्पून तेल
३ टेबलस्पून तांदळाचं पीठ(लाटताना लावण्यासाठी) 

कृती:
१. गव्ह्याच्या पिठात, मीठ,साखर,तिळ,हळद, जिरेपूड  घालून नीट मिक्स करा.  
२. आलं, लसूण,कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक वाटून त्याची पेस्ट करा. हि पेस्ट आणि पालक बारीक चिरून पिठात घालून मिश्रण हाताने नीट कालवून घ्या.
३. १ टीस्पून तेल आणि पाणी घालून पीठ  थोडे भिजवून घ्या. पीठ खूप सैलसर किंवा अगदी घट्ट भिजवू नका. पालेभाजीत आधीच पाणी असते त्यामुळे नंतर पीठ आणखीन सैलसर होईल.
४. पीठ भिजवून झाले कि त्याला तेलाचा हात लावून मळुन घ्या. आणि १ तास झाकून ठेवा  म्हणजे पीठ चांगले मुरेल.
५. लाटायच्या आधी पीठ परत एकदा छान मळुन घ्या. आणि समान ५ गोळे करून परोठे लाटा. लाटताना परोठा चिकटू नये म्हणून वरून तांदळाचं पीठ भुरभुरवा.
६. परोठे खूप पात्तळ लाटू नका. तवा गरम करून दोन्ही बाजूनी  व्यवस्थित भाजून घ्या. सर्व्ह करताना वरती किंचित बटर लावा.

2 comments:

  1. मला तुमचं रेचीपेस खूप खूप आवडतात, खास करून नोन-वीज, कृपा करून चीकीन तंदुरी रेसिपी बनवण्याची पद्धती सांगावी.. मी आपला आत्येंत आभारी आहे! धन्येवाद..

    ReplyDelete
  2. Thank you som..
    chicken tandurichi recipe lavkarat lavkar post karaycha prayatna karin.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!