मालवणी कोलंबी मसाला- Malvani Prawn Masala

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी


साहित्य:
२०-२२ मध्यम आकाराच्या कोलंब्या
वाटणासाठी-
१ मध्यम कांदा उभा चिरून
१/२ कप किसलेलं सुकं खोबरं
४-५  लवंगा
१" दालचिनी तुकडा 
२ वेलदोडे
१ टीस्पून बडीशेप
१ १/२ टीस्पून धने
२ लसूण पाकळ्या
ग्रेवीसाठी-
१/२ कप बारीक चिरलेला कांदा 
१/२ टीस्पून हळद
१ १/४ टीस्पून लाल तिखट
२-३ सोलं (आमसुलं ) 
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल 

कृती:
१. कोलंबीचा धागा आणि कवच काढून साफ करून घ्या.
२. दोन टेबलस्पून तेलात वाटणासाठीचा कांदा, लसूण,लवंगा,वेलदोडे,दालचिनी,धने आणि बडीशेप ; कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं घालून खोबरं; तांबूस होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.  भाजलेलं सगळं जिन्नस मिक्सरमध्ये १/२ कप गरम पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर हळद ,तिखट आणि वाटण घालून २-३ मिनिटे परता. कोलंबी घालून परता.
४. मीठ घालून ढवळा. झाकण ठेवून कोलंबी व्यवस्थित शिजवा. कोलंबी शिजल्यावर सोलं घालून १ उकळी काढा.
५. ५-१० मिनिटे वाफ मुरु द्या. नंतर कोथिंबीर पेरून सोलकढी आणि भाताबरोबर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

1 comments:

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!

Print This Recipe Print This Recipe