सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी
साहित्य:
२ टेबलस्पून तुरीची डाळ
२ टेबलस्पून साली सकट उडदाची डाळ
२ टेबलस्पून ओलं खोबरं
१/२" आले
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून लिंबू रस
४-५ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल
कृती:
१. दोन्ही डाळी एकत्र करून धुवून घ्या. पाणी घालून कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्या.
२. शिजवलेली डाळ घोटून त्यात मीठ,हळद,लिंबुरस,ओलं खोबरं घाला. मिक्सरवर आले आणि हिरवी मिरची बारीक वाटून घाला.
४. पाणी घालून डाळ उकळायला ठेवा. डाळ चांगली उकळली कि फोडणीच्या कढईत तेल गरम करा.
५. तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला. कढीपत्ता पाने आणि हिंग घालून आमटीला फोडणी द्या.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!