Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
२ कप न सोललेले कच्चे काजू (ओले काजू )
१ कप मटार (आवडीप्रमाणे)
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून हळद
हिंग
४-५ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
वाटणासाठी-
१/२ कप ओलं खोबरं
४-५ मिरी
१ हिरवी मिरची
१ कप मटार (आवडीप्रमाणे)
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून हळद
हिंग
४-५ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
वाटणासाठी-
१/२ कप ओलं खोबरं
४-५ मिरी
१ हिरवी मिरची
चिमुटभर साखर
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल
कृती:
१. काजू १-२ तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. काजू पूर्ण भिजले कि त्याची साले काढून टाका.
२. खोबरं, मिरी, हिरवी मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करा आणि कढीपत्ता फोडणीला घाला. लगेचच कांदा घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
३. नंतर वाटलेला मसाला घालून परता. हळद ,धने-जिरेपूड, मीठ आणि साखर घाला. १ उकळी काढून काजू आणि मटार घालून परता.
४. झाकण ठेवून ५-१० मिनिटे काजू आणि मटार चांगले शिजू द्या. गॅस बंद करा. वाफ मुरली कि पोळी बरोबर उसळ सर्व्ह करा.
टीप: मटार न वापरता नुसत्या काजूची उसळ सुद्धा करतात.

कसं कळते गं तुला मी ह्यावरच पोस्ट टाकणार आहे ते.. :D ओले काजू मस्त मिळत आहेत आता... :D
ReplyDeleteRohan..are..very good..काजूची उसळ हाणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे :)
ReplyDeleteहोय ना.. काही दिवसांपूर्वीच हाणली.. :) फोटो टाकतो ब्लॉगवर काही दिवसात... :)
ReplyDelete