खेकडा भजी(कांदा भजी)-Kanda Bhaji

पाऊस म्हटलं कि आठवतो ओल्या मातीचा सुगंध, हवेतला गारठा, हिरवागार निसर्ग, क्वचित दिसणारे इंद्रधनुष्य, एखादं रोमँटिक गाणं
आणि आठवते कांदा भजी !
कांदा भजीची खरी आवड निर्माण झाली ती सिंहगडावर. कित्येकवेळा सिंहगडावर जायचं ठरलं कि, ए... आणि कांदा भजी पण खाऊया हे वाक्य ठरलेलं :-)
अशी हि सगळ्या महाराष्ट्राची आवडती कांदा भजी...


Read this recipe in English
सर्विंग:
८ ते १० भजी

साहित्य:
१ मोठा कांदा
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून तांदळाचं पीठ
कांद्यात मावेल तितके बेसन अंदाजे ३ टेबलस्पून बेसन
१ टीस्पून कडकडीत तेलाचे मोहन
तळण्यासाठी तेल









कृती:
१. कांदा उभा आणि पात्तळ चिरा.
२.त्यात मीठ - साखर,हळद तिखट ,बेसन आणि तांदळाचे पीठ घालून हाताने मिक्स करा.
३. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि १ चमचा गरम तेल मिश्रणात घाला.गॅस बारीक करा.१ टेबलस्पून मापाने थोडे थोडे मिश्रण कढईत अंतरा-अंतरावर सोडा. मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भजी तळा.
४. भजी बरोबर आवडीप्रमाणे लसणीची सुकी चटणी किंवा टोमॅटो केचप द्या.

टीप: कांद्यात मावेल इतकेच बेसन घाला. जास्ती बेसन घातले तर भजी आतून कच्ची राहील आणि कुरकुरीत होणार नाही 


21 comments:

  1. कल्याणी... खपलो. मेलो. ठार झालो...!!! काय फोटो आहे. सिंहगडावरील भजी म्हणजे जीव की प्राण. किमान ३ प्लेट खाल्ली पाहिजे गेलो की. आता ह्या पावसाळ्यात मिशन सिंहगड... सुभेदार मी येतोय... :)

    ReplyDelete
  2. :-)thanks Rohan for a lovely comment!

    ReplyDelete
  3. aaila ! kay bhaji aahet! aatta khavishi watat aahet

    ReplyDelete
  4. My god baghunach tondala pani sutale

    Shashikala

    ReplyDelete
  5. फारच छान साईट आहे तुमची!

    ReplyDelete
  6. Masatach , Bagunach pani sutale tondala
    Thanks, for recipe

    ReplyDelete
  7. it's very good site. thanks for everything.
    Harshada Wagholikar, pune.

    ReplyDelete
  8. खूपच छान रेसिपीज आहेत तुमच्या.

    ReplyDelete
  9. very very very nice site

    Manoj

    ReplyDelete
  10. Very good reciepies. Thanks. It gave us much knowledge.

    ReplyDelete
  11. very very tasty ...............

    ReplyDelete
  12. Tumhi delili kandabhajyachi kruti ekdam sopi ahe.

    ReplyDelete
  13. superb recipe...yummy....

    ReplyDelete
  14. Super yaar...bangalore la kama sathi astana he sagale chote padhaarta mi ikde vaachun try karto....
    Thx a lot Kalyani...Chaan site aahe...

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!