श्रीखंड-Shrikhand

सर्व्हिंग: २ माणसे

साहित्य:
२०० ग्रॅम चक्का ( १ १/४ कप)
( घरगुती चक्का असा बनवा )
१/२ कप साखर
१/२ टीस्पून वेलचीपूड
२ टेबलस्पून कोमट दुध
चिमुटभर केशर
१ टीस्पून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
कृती:
१. साखर आणि वेलची पूड एकत्र करून मिक्सरवर बारीक दळून घ्या. कोमट दुधात केशर खलून ठेवा.
२. दळलेली साखर आणि चक्का एकत्र करा. हँड मिक्सरनी दोन्ही एकजीव करून घ्या. साखरेमुळे श्रीखंडाला चकाकी येईल.हँड मिक्सर नसेल तर चमच्याने गोल गोल फिरवून छान एकजीव करून घ्या, म्हणजे साखर पूर्ण विरघळून जाईल.
३. नंतर मिश्रणात केशर घातलेले दुध,बदाम,पिस्त्याचे पात्तळ काप घालून मिक्स करा. श्रीखंड फ्रीज मध्ये ठेवा आणि पुरी बरोबर थंडगार सर्व्ह करा.

 टीप: चक्का जास्ती आंबट झाला तर साखरेचे प्रमाण वाढवा. 
याच पद्धतीने आंब्याचा रस घालून आम्रखंड करता येईल परंतु त्यात सुकामेवा आणि केशर न घालता फक्त आंब्याचा रस घाला.

5 comments:

  1. Ek number....tondala pani sutala :-)

    ReplyDelete
  2. घरपोच देता का??? हेहेहे... बघून खावेसे वाटते आहे... माझा सुद्धा एक फ़ूडब्लॉग आहे. त्यावर तुमच्या ब्लॉगची लिंक देत आहे ... :)

    ReplyDelete
  3. धन्यवाद रोहन!:)

    ReplyDelete
  4. pahunach tondala pani aal..........aaaah

    ReplyDelete
  5. khup chan recipe ahe, mi nakki karun pahin....... :)

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!