साहित्य:
४ कप घट्ट दही
दीड फुट x दीड फुट सुती कापड
१ छोटे पातेले
कृती:
१. पातेल्यावर सुती कापड घाला आणि ४ कप मापानी घट्ट दही कापडावर घाला. कापडाची चारही टोकं धरून गाठ मारा. बोटांनी दही घट्ट आवळून घ्या.
२. कापडाची गाठ सैल वाटत असेल तर वरून दोरा गुंडाळून त्याची घट्ट गाठ मारा. कापडात बांधलेले दही रात्रभर टांगून ठेवा. ७-८ तासांनी दह्यातले सगळे पाणी गळून जाईल आणि घट्ट चक्का तयार होईल.
चक्क्याला किंचित आंबटपणा असला पाहिजे. आंबटपणा नसेल तर आणखीन १-२ तास चक्का तसाच टांगून ठेवा.
टीप: चक्का बनवायला शक्यतो साईचे दही वापरू नका त्यामुळे श्रीखंडाचे टेक्चर स्मूथ होणार नाही. घरचे दही घट्ट नसेल तर रेडीमेड organic दही वापरून चक्का तयार करा

i was looking for a marathi recipe blog and found you..amazing recipes..ekdum masta!
ReplyDeleteAmruta