Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
२ टेबलस्पून तुरीची डाळ
२ टेबलस्पून चण्याची डाळ
२ टेबलस्पून उडदाची डाळ
२ टेबलस्पून मुगाची डाळ
२ टेबलस्पून हिरवे मुग
फोडणीसाठी-
३ टेबलस्पून तेल
१ सुकी मिरची
३-४ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून धनेपूड
१ चिमुट गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हिंग
२ लवंगा
१ तमालपत्र
१ तमालपत्र
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टोमॅटो बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
१ टीस्पून आल्याची पेस्ट
१ टेबलस्पून गुळ
१ टेबलस्पून गुळ
कृती:
१. चारही प्रकारच्या डाळी आणि हिरवे मुग एकत्र करून कोमट पाण्यात २ तास भिजत घाला.
२. दोन तासांनी अडीच पट पाणी घालून डाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्या. नंतर शिजवलेली डाळ डावाने चांगली घोटून एकजीव करा.
३. एका पातेल्यात तेल गरम करा. तेल तापले कि प्रथम तमालपत्र मग जिरे, लवंग,सुकी मिरची दोन तुकडे करून घाला. हिंग, कढीपत्ता घाला.फोडणीचा छान वास आला कि, बारीक चिरलेला कांदा आणि आल्याची पेस्ट घालून ३-४ मिनिटे परतून घ्या. नंतर हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. १/४ टीस्पून मीठ घाला आणि ५ मिनिटे छान परतून घ्या.
४. मग घोटलेली डाळ घाला. गुळ आणि मीठ घालून डाळ २-३ मिनिटे उकळत ठेवा.
५. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बाटी किंवा राइस बरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!