पुरी-Puri

सर्व्हिंग: १०-१५ पुर्‍या

साहित्य:
३/४ कप गव्हाचं पीठ
१ टीस्पून बारीक रवा
१/२ टीस्पून मीठ
१/४ टीस्पून साखर
१ टेबलस्पून थंड तेलाचे मोहन
पीठ मळायला पाणी
लाटलेल्या पु-या झाकायला ओले फडके
पुर्‍या तळण्यासाठी तूप किंवा तेल 

कृती: 
१. गव्हाचं पीठ, बारीक रवा, साखर आणि मीठ हाताने एकत्र करून घ्या. त्यात थंड तेलाचे मोहन घाला.
२. मोहन घातल्यावर हाताने पीठ कालवून घ्या. गार पाण्याने पुरीसाठी सहज लाटता येईल इतपत घट्ट पण मऊसर पीठ मळून घ्या.
३. मळलेले पीठ १/२ तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने पीठाचे १" चे समान आकाराचे गोळे करून घ्या.
४. एकीकडे कढईत तेल तापवत ठेवा. दुसरीकडे जमतील तेव्हढ्या पुर्‍या लाटून घ्या. पुर्‍या वाळू नयेल म्हणून ओल्या फडक्याने झाकून ठेवा. पुर्‍या साधारण १ ते २ mm जाडीच्या आणि ४" व्यासाच्या लाटा. पुरी खूप पात्तळ लाटु नका.
५. तेल तापले कि एक एक पुरी कढईत सोडून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या. कढईत घातल्यावर पुरी झार्‍याने कडे कडेने हलक्या हाताने दाबा म्हणजे टम्म फुगून येईल.
६. गरम गरम पुर्‍या श्रीखंडाबरोबर सर्व्ह करा.
घरगुती चक्क्यापासून श्रीखंड- रेसिपीसाठी क्लिक करा
.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!