साहित्य:
१ कप तांदळाचं पीठ
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेबलस्पून कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
१/४ कप तेल
कृती:
१. तांदळाच्या पिठात मीठ,कांदा,बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून हाताने कालवून घ्या.
२. गार पाण्याने सगळे मिश्रण, पोळीच्या पिठासारखे भिजवून घ्या. पीठ थोडेसे सैलसर भिजवा म्हणजे थालीपीठ थापताना सोपे जाईल.
३. पीठाचे समान २ १/२" ते ३" गोळे करून घ्या. तवा गार असतानाच त्यावर १ चमचा तेल घाला. थालीपीठाचा गोळा त्यावर ठेवा.
४. थालीपीठ चार बोटांनी हळू हळू दाब देत गोल थापून घ्या. पीठ हाताला चिकटत असेल तर हात ओला करून थापा.
५. थालीपीठ पात्तळ थापून घ्या आणि बोटाने ३-४ जागी भोकं करा. चमच्याने २-३ थेंब तेल सगळ्या भोकात सोडा. थालीपीठाला सगळ्या बाजूने गोल असे तेल सोडा.
६. गॅस चालू करून वरून घट्ट झाकण ठेवा. ३-४ मिनिटांनी चुरचुर आवाज यायला लागला कि झाकण काढून टाका.थालीपीठ खालच्या बाजूनी छान भाजून होईल आणि वरची बाजू वाफेनी शिजेल. थालीपीठ न उलटता तसेच गोड लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.तांदळाचे थालीपीठ करायला एकदम सोपे आणि झटपट होते; शिवाय कुरकुरीत आणि चवीला एकदम झकास लागते.
टीप: तवा गरम असेल तर ओल्या फडक्याने पुसून थंड करून घ्या आणि तेल घालून पुढचे थालीपीठ थापून घ्या.
Atishay sunder!! aapan ek chhanse pustak hi prakashit karu shaktaa!!!
ReplyDelete