१ कप खवलेलं ओलं खोबरं
१ सुकी लाल मिरची
१/२ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून मोहरी
३-४ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून आल्याची पेस्ट
२ टेबलस्पून दही (आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून साखर
१ १/२ टेबलस्पून तेल
कृती:
१. खोबरे, आल्याची पेस्ट, मीठ आणि साखर किंचित पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
२. वाटणात दही मिक्स करा. फोडणीच्या कढईत तेल गरम करा.
३. तेल चांगले तापले कि उडदाची डाळ घाला. डाळ गुलाबी झाली कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, मेथीदाणे, कढीपत्ता पाने आणि सुकी मिरची २ तुकडे करून घाला.हिंग घालून चटणीला फोडणी द्या.
४. हि चटणी इडली, उत्तपा किंवा मेदू वड्याबरोबर खूप छान लागते.
chatnit hirvi mirchi ghalu ka?
ReplyDelete@ Vaishnavi
ReplyDeleteho khobra vatatana hirvi mirchi ghatli tari chalel.Pan mirchicya biya kadhun ghal mhanje chatni khup tikhat honar nahi.