Read this recipe in English
सर्व्हिंग: ६ पुरणपोळ्या
सर्व्हिंग: ६ पुरणपोळ्या
साहित्य:
पुरणासाठी-
१/२ कप (साधारण १ वाटी) चणा डाळ
डाळ शिजवायला पाणी
१/२ कप किसलेला गुळ
१ चिमुट जायफळाची पूड
१ चिमुट वेलची पूड
१ चिमुट केशर
आवरणासाठी-
१ चिमुट केशर
आवरणासाठी-
१/८ कप मैदा
१/८ कप गव्हाचं पीठ
१ चिमुट हळद
१/२ टीस्पून मीठ
३ टीस्पून तेल
कृती:
१. पुरण बनवण्यासाठी-प्रथम चण्याच्या डाळीत एकूण डाळीच्या ५ पट पाणी घालून कुकरमध्ये डाळ मऊसर शिजवून घ्या.डाळ शिजली कि चाळणीत घाला खाली एखादे पातेले ठेवा.वरचे सगळे पाणी (कट) निथळून जाऊ दे. या पाण्याचीच नंतर कटाची आमटी करा.
२. डाळीतले सगळे पाणी निथळून गेले कि, डाळ चांगली घोटून घ्या. त्यात किसलेला गुळ घाला. एका जाड भूदाच्या भांड्यात हे मिश्रण शिजवत ठेवा.
३. तळाला करपू नये म्हणून डाळ सतत ढवळा. जरा वेळानी मिश्रण घट्ट व्हायला लागेल. डाव पुरणात उभा राहायला लागला म्हणजे पुरण तयार झाले. पुरणात जायफळ आणि वेलचीपूड घाला.
४. पुरण गरम असतानाच पुरणयंत्र किंवा मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. एका भांड्यात पुरण झाकून ठेवा.
५. आवरणासाठीचे पीठ-
मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करा. त्यात हळद आणि मीठ घाला. गार पाण्याने पीठ सैलसर मळून घ्या. वरून १/२ चमचा तेल लावून पुन्हा मळून घ्या.
६.एका बाउल मध्ये ३ चमचा तेल घाला. त्यात मळलेले पीठ घाला आणि वर खाली करून झाकून ठेवा.
७. पीठ ७ ते ८ तास मुरु द्यावे. पीठ हाताने ओढून पहिले कि त्याला छान elasticity यायला पाहिजे. पुरण पोळी लाटायच्या आधी पीठ परत एकदा मळून घ्या.
८. पुरण पोळी लाटायच्या आधी पुरणाचे १ १/२" आकाराचे गोळे करून घ्या आणि पीठाचे पुरणाच्या बरोबर आकाराने निम्मे गोळे करा.
९. पिठाचा गोळा पुरी सारखा गोल आणि पात्तळ लाटून घ्या. त्यावर मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवा आणि मोदकासारखा बंद करून घ्या.
१०. गोळा हलक्या हाताने दाबा आणि मैद्यात लोळवून हलक्या हाताने पात्तळ पोळी लाटून घ्या. पोळी लाटताना कडेकडेने हलक्या हाताने लाटावी. मध्ये मध्ये मैदा भुरभुरवून पोळी गोल गोल फिरवत रहा म्हणजे खाली चिकटणार नाही.
१०. तवा गरम करून त्यावर पोळी अलगद घाला. तव्यावर घातलेली बाजू पूर्ण भाजली गेली कि पोळी उलटा आणि दुसरी बाजू भाजून घ्या. पोळी एकदाच उलटवा. गरम पोळीवर तूप घालून सोबत कटाची आमटी किंवा दुध द्या.

मस्त :)
ReplyDeleteDhanyawad Suhas
ReplyDeleteHi Kalyani,
ReplyDeleteI tried the receipe for ''Puranpoli' first time as you have given. All are appreciated especially my ''Fiance''.
Thanks for making my day memorable.
With Regards,
Reshma
Hi Reshma
ReplyDeletemala avarjun kalavlyabaddal dhanyawad :)