कटाची आमटी-Katachi Amti

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 
पूर्व तयारी : १/२ कप चण्याची डाळ ५ कप पाणी घालून मऊसर शिजवून घ्या. वरचे पाणी गाळून (कट) आमटी करण्यासाठी घ्या. शिजवलेली चणा डाळ पुरणपोळीसाठी बाजूला ठेवा.





साहित्य:
३ कप चणा डाळ शिजवलेले पाणी
मसाला -

( २ टेबलस्पून सुका खोबरं+ १/४ टीस्पून जिरे+ २ मिरी+१ लवंग+१/२" दालचिनीचा तुकडा) भाजून बारीक वाटून घ्या.
२ १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
३ टेबलस्पून गुळ
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१ १/२ टीस्पून गोडा मसाला
१/४ टीस्पून हळद
फोडणीसाठी- १/२ टीस्पून मोहरी,१/४ टीस्पून हिंग, ७-८ कढीपत्ता पाने चिरून


कृती:
१. डाळीच्या पाण्यात (कटात) भाजून वाटलेला मसाला घाला.
२. चिंचेचा कोळ, गुळ, लाल तिखट,गोडा मसाला, हळद आणि मीठ घाला.
३. आमटी चांगली उकळवा. फोडणीच्या कढईत तेल चांगले गरम करा. तेल तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर मग कढीपत्ता आणि हिंग घालून आमटीला फोडणी द्या.
४. कटाची आमटी पुरणपोळी बरोबर करण्याची पद्धत आहे.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!