तंदुरी चिकन-Tandoori chicken

सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
४०० ग्रॅम चिकन विथ बोन्स
२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
२ ते ३ टेबलस्पून घट्ट दही
२ टीस्पून तंदूर मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट (बेडगी)
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हळद
२ टीस्पून लिंबू रस
लाल फूड कलर (Optional )
मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून तेल
२ टीस्पून बटर
१ टीस्पून चाट मसाला वरून घालण्यासाठी
सॅलडसाठी-
 १ कांदा, उभा चिरून
१ कप कोबी उभा आणि पात्तळ चिरून
सॅलडला लावण्यासाठी तिखट,मीठ,लिंबू

कृती:
१. दही गाळण्यात घालून ५-१० मिनिटे एखाद्या बाउलवर ठेवा. म्हणजे जास्तीचं पाणी गळून घट्ट दही मिळेल.
२. मॅरीनेट करण्याचा  मसाला बनवण्यासाठी  घट्ट दह्यात , आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला,लाल तिखट, हळद, धने-जिरेपूड,मीठ, १ टीस्पून तेल  आणि लिंबू रस घाला.  चमच्याने चांगलले फेटून घ्या.
३. चिकनच्या थाय आणि लेग्जना सगळ्या बाजुनी सुरीने चीर द्या. उरलेल्या चिकनचे ३" चे तुकडे करा  सगळ्या चिकनला तयार केलेला मसाला लावून ७-८ तास मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
४. ओव्हन ४०० F तापमानाला प्रीहीट करा. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या आणि त्यावर चिकनचे पिसेस अरेंज करा. प्रीहीटेड  ओव्हनमध्ये चिकन ३० मिनिटे बेक करा. १५ मिनिटांनी चिकन उलटं करून वरून किंचित बटर सोडा आणि उरलेली १५ मिनिटे बेक करा.
५. गरम तंदुरी चिकनवर लिंबुरस आणि चाट मसाला भुरभुरा बरोबर कांदा आणि कोबीचं सॅलड सर्व्ह करा.

टीप: 
१. चिकन थाय आणि लेग्जना चीर दिल्यावर मॅरीनेट करण्याचा  मसाला आत पर्यंत जाईल याची काळजी घ्या.
२. चिकन जास्ती वेळ  बेक केल्यास चिवट होण्याची शक्यता असते.  
३. चिकनला जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर एक सोपी टीप,
कोळश्याचा  छोटा तुकडा चिमट्यात पकडून  गॅसच्या फ्लेमवर किंवा मेणबत्तीवर लाल होईपर्यंत गरम करा. एका वाटीत हा तुकडा घालून तंदुरी चिकनच्या प्लेटमध्ये मधोमध ठेवा. कोळश्याच्या तुकड्यावर चमचाभर तूप घाला म्हणजे धूर यायला लागेल लगेचच वरून एखादं पातेलं ठेवून बंद करा. ५-७ मिनिटे तसंच झाकून ठेवा म्हणजे चिकनला कोळश्याचा मस्त फ्लेवर येईल :)
आहे कि नाही झक्कास आयडिया !

5 comments:

 1. ek dum zakaa boos mala hi recip kup kup kup aawadli aahe mi nakii karnaar!!!!!! thanx so much, are ho mi maza int. decha wisarlo my self sumit shelar... i like cocking its my hobbyi..

  ReplyDelete
 2. ekdam best... Amantran dilat tar nakkich chav gheyla yenar...

  ReplyDelete
 3. 1kdam mast....
  wachatanach tondala poor aala. nakki banaun pahin ghari.

  ReplyDelete
 4. laiiiiiiiiiiiii BHARI...!

  ReplyDelete
 5. Sexy.....Recip..

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!