कोकणी (गोअन) स्वयंपाकात अनेक वेगवेगळे पदार्थ असतात. त्यापैकी बहुतेक पदार्थांमध्ये नारळ आणि कोकम यांचा वापर जास्ती केला जातो. काही पदार्थांमध्ये गावठी आंबे(घोटं) ,अंबाडे आणि कैरी सुद्धा वापरली जाते. तर, उडदा मेथी हि आमटी अशीच कैरी वापरून करतात. हि आंबट-गोड आमटी कोकणी पदार्थांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गरम भातावर तर उडदा मेथी फारच झक्कास लागते.
कैरी आणली कि मला तिचा कुठे कुठे वापर करू असा होतं.पन्हे ,सार, कायरस, कैरीडाळ, कैरीची चटणी इतके पदार्थ आहेत. नक्की आज काय करूया असा विचार करत होते तर आठवलं उडदा मेथी खाऊन अनेक दिवस झाले आहेत. विचारांनीच तोंडाला पाणी सुटलं. लगेच कैरी घेतली आणि कामाला लागले.
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१ छोटी कैरी सालं काढून (१"ते दीड इंचाच्या ७-८ फोडी)
२ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून मेथीदाणे
२ सुक्या मिरच्या
१ १/२ टीस्पून धने
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
१ १/२ ते २ कप पाणी
२ टीस्पून किसलेला गुळ
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी- १ १/२ टेबलस्पून तेल ,१/२ टीस्पून मोहरी,१/४ टीस्पून हिंग,३- ४-कढीपत्ता पाने

कृती:
१. कैरीची साले काढून तिच्या एक ते दीड इंचाच्या फोडी करून घ्या.
२. उडदाची डाळ,मेथीदाणे,धने आणि सुक्या मिरच्या खमंग वास सुटे पर्यंत कच्चे भाजून घ्या. नंतर ओल्या खोब-याबरोबर १/२ कप गरम पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
३. वाटणात आणखीन १ कप पाणी,हळद,मीठ आणि कैरीच्या फोडी घालून ढवळून घ्या. आमटी उकळायला ठेवा. उकळी आल्यावर २-३ मिनिटे कैरी झाकण ठेवून शिजवून घ्या.
४. कैरी शिजली कि तिचा आंबटपणा आमटीत उतरेल. मग आमटीत चवीप्रमाणे गुळ घाला.१-२ मिनिटे आमटी तशीच उकळत ठेवा. नंतर गॅस बंद करा
५. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि कढीपत्ता पाने आणि हिंग घालून आमटीला वरून फोडणी द्या. गरम गरम आमटी भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
mi pan karun baghitali. mastach zali
ReplyDeletewow kairichi aamti khup ruchkar zali
ReplyDelete