झटपट अंड्याची भाजी -Boiled Eggs Stir Fry

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
४ अंडी
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून बारीक चिरलेले आले
२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून सांबार मसाला
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून कोथिंबीर 
२ टेबलस्पून तेल

कृती:
१. अंडी उकडून सोलून ठेवा. उकडल्या अंड्यांचे  १/२" च्या फोडी करून घ्या.
२. कढईत तेल गरम करा. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. कांदा फोडणीला घाला. ३-४ मिनिटे कांदा परतून त्यात बारीक चिरलेले आले, हळद आणि सांबार  मसाला घालून २-३ मिनिटे परता.
३. अंड्याच्या फोडी घालून परता. मीठ घालून परता. झाकण  ठेवून १ वाफ आणा आणि पोळी बरोबर सर्व्ह करा.

1 comment:

  1. mi keli hoti ghari, ani saglyana aavadali.... thanx....... :)


    From
    Jyoti........

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!