सर्व्हिंग: १ कप
साहित्य:
वाटणासाठी-
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
३/४ कप निवडलेली कोथिंबीर
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
३/४ कप निवडलेली कोथिंबीर
१-२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून चिंचेचा कोळ
३/४ टीस्पून मीठ
१ १/४ टीस्पून साखर
फोडणीसाठी-
१ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
३ कढीपत्ता पाने
कृती:
१. चटणीसाठी वाटणासाठीचं सगळं साहित्य मिक्सरवर १/४ -१/२ कप कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.
२. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि,मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने आणि हिंग घालून चटणीला फोडणी द्या.
३. हि चटणी डोसे, इडली,कुठल्याही प्रकारचे वडे,पोळे यांच्याबरोबर सर्व्ह करू शकता.




nakki avadali ki kothimbir chi chatani
ReplyDelete