नागपुरी गोळा भात-Nagpur Special Gola Bhat

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी


साहित्य:
भातासाठी-
३/४ कप बासमती तांदूळ
तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून जिरे
२ टेबलस्पून तेल 
गोळ्यासाठी-
१/२ कप ते ३/४ कप बेसन
१/२ टीस्पून ओवा
१ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२ टीस्पून कडकडीत गरम तेलाचे  मोहन
पीठ कालवण्यासाठी थोडेसे पाणी
फोडणीसाठी-
१/४ ते १/२ कप तेल
३-४ सुक्या मिरच्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग


कृती:
१. एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात मीठ,साखर,ओवा, धने-जिरेपूड ,हळद आणि तिखट घालून एकत्र करा. कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करा. किंचित पाणी घालून कालवून घ्या.मिश्रण चिकट होईल इतकेच पाणी घाला. मिश्रण पात्तळ करू नका.
२. १० मिनिटे आधीच तांदूळ धुवून ठेवा. पातेल्यात तेल गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला कि, धुतलेले तांदूळ घालून परता. ३-४ मिनिटे तांदूळ सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्या. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून धावला. झाकण ठेवून भात शिजवत ठेवा. भात पूर्ण शिजयच्या थोडा आधी, मिश्रणाचे चमच्याने १ १/२ " गोळे करून मध्ये मध्ये घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजले जातील.
३. दुसरीकडे छोट्या  कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. फोडणी पूर्ण गार होऊ द्या.
४. १५-२० मिनिटांनी फोडणी गार झाली कि जेवताना भातावर  प्रत्येकी १ ते २ टेबलस्पून तेल घ्या. फोडणीतली  मिरची आणि गोळा भातामध्ये कुस्करून गोळा भाताचा आस्वाद घ्या. :) 
खाताना वजनाचा विचार मात्र करू नका कारण. गोळा भातावर घ्यायच्या फोडणीमुळेच जास्ती मजा येते. 
सोबत कैरीचे सार किंवा आमसुलाचे सार द्या.

4 comments:

 1. अंजली जोशी, न्यू जर्सीOctober 15, 2010 at 6:37 PM

  माझ्या सासूबाई हा गोळा भात करायच्या.ह्याची कृती विसरल्यासारखी झाली होती.पण या ब्लॉगवर वाचायला मिळाली.सासर मूळ चंद्रपूरचे असल्याने सर्वांना हा प्रकार आवडायचा.आता परत करून पाहिला. व सर्वांना आवडला

  ReplyDelete
 2. कमेंटसाठी खूप धन्यवाद अंजली..
  माझ्या ब्लॉगच्या निमित्तानी तुमच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि तुम्ही गोळाभात करून पाहिलात हे वाचून खूप छान वाटलं

  ReplyDelete
 3. sundar :) lagech karun pahato

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!