सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१ मध्यम कैरी
१/२ कप किसलेला गुळ
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी-
१ १/२ टेबलस्पून तेल
२ सुक्या मिरच्या
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
कृती:
१. कुकरमध्ये थोडे पाणी घालून कैरी उकडून घ्या. कुकर थंड झाला कि, कैरीची साले काढून टाका.
२. कैरीचा गर काढू घ्या. कैरीची सालं पाण्यात घालून २-३ वेळा पिळून घ्या म्हणजे त्याला लागलेला गर सुद्धा निघून घेईल. कैरीचा गर आणि सालं पिळलेले पाणी मिक्सरमध्ये काढून प्युरी तयार करा.
३. प्युरी खूप जाडसर असेल तर पाणी घालून थोडा पात्तळ करून घ्या. सार हे ब-यापैकी पात्तळ असते.
४. त्यात मीठ आणि गुळ घालून ढवळा आणि गुळ पूर्ण वितळेपर्यंत उकळत ठेवा.
५. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, जिरे आणि मेथीदाणे घाला. मिरच्या २ तुकडे करून घाला. मिरची छान तळून आली कि हिंग घालून लगेच साराला फोडणी द्या. ५-७ मिनिटे झाकून ठेवा आणि मग सर्व्ह करा.

awesome
ReplyDelete