चिकन करी -Chicken Curry

साधी आणि करायला एकदम सोपी अशी रेसिपी! 
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
२५० ग्रॅम चिकन
१ मध्यम कांदा,तुकडे करून
२ टोमॅटो
१/२" आलं
३-४ मध्यम लसूण पाकळ्या
१ १/२-२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून कसुरी मेथी
२ मसाला वेलची
१ तमालपत्र
३ टेबलस्पून तूप
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१. टोमॅटो उकडून सालं  काढा आणि मिक्सरवर जाडसर  प्युरी करून घ्या.
२. कांदा, आलं लसूण एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात तूप गरम करा. तूप तापले कि, मसाला  वेलची आणि तमालपत्र घाला.
४. छान वास सुटला कि,वाटलेला कांदा-आलं-लसूण पेस्ट घालून ५-६ मिनिटे परता.
५. कांदा शिजला कि, त्यात लाल तिखट,हळद,मीठ आणि टोमॅटो प्युरी घाला आणि तूप सुटे पर्यंत शिजवा.
६. तूप सुटल्यावर चिकनचे तुकडे घाला आणि झाकण ठेवून चिकन शिजवत ठेवा.  गरज वाटल्यास थोडे पाणी घालून रस्सा  पात्तळ करा.
७. चिकन पूर्णपणे शिजले कि, कसुरी मेथी घालून मिक्स करा. गॅस बंद करा. झाकण ठेवून थोड्यावेळानी चिकन सर्व्ह करा.

4 comments:

  1. Thanks for making this good website....!!!

    Today just i type recipes found marathi web site which is very good verity of dishes with good explaation.

    One most important all names of Ingredients are given in marathi so it is very easy to identify the Ingredients else we need to search a dictionary .

    Today we try Paneer butter masala. and it was good.

    Thanks
    Rupali Suryavanshi

    ReplyDelete
  2. mala hi soppy chicken khup awadali.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!