१ कप गव्हाचं पीठ
१ टेबलस्पून बेसन
१/४ कप गव्हाचं जाडसर पीठ / रवा
१ कप मेथीची पाने
३/४ कप दुधी भोपळ्याचा कीस
१/४ कप गाजराचा कीस
१ १/२ टेबलस्पून आलं-लसूण हिरवी मिरचीची पेस्ट (२ मध्यम लसूण पाकळ्या+ १/२" आलं + १ हिरवी मिरची)
१/२ टेबलस्पून तीळ
मीठ चवीप्रमाणे
१ १/२ टीस्पून साखर
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ १/२ टीस्पून धनेपूड
१ १/२ टीस्पून जिरेपूड
२ टेबलस्पून थंड मोहन (तेल)
२ टेबलस्पून दही
मुठिया तळण्यासाठी तेल
कृती:
१. दुधीचा कीस ,गाजराचा कीस एकत्र करा. त्यात मेथीची पाने चिरून घाला. त्यात मीठ,साखर,आलं- लसूण -मिरची पेस्ट ,तीळ घाला आणि सगळं कालवून घ्या.
२. बेसन आणि रवा घाला. मिश्रणात मावेल तितकं गव्हाचं पीठ घाला. २ टेबलस्पून मोहन घाला आणि दही घालून पीठ मळून घ्या.गरज लागल्यास आणखीन थोडेसे दही घाला पण थोडेसे सुद्धा पाणी घालू नका.
३. लगेचच पीठाचे १ १/२"- २" गोळे करा आणि त्याला लांबट आकार द्या.
४. तेल गरम करून मंद आचेवर मुठिया ब्राऊन रंग येई पर्यंत तळून घ्या.
टीप:
१. मुठिया तळण्याच्या आधी तेल तापले आहे याची खात्री करून मंद आचेवर तळून घ्या. तळण्याच्या आधी पिठाचा छोटासा गोळा तेलात टाकून बघा. पिठाचा गोळा हळू हळू तरंगत वर आला याचा अर्थ तेल तापले आहे
२. मेथीची पाने कमी असतील तर १/२ टीस्पून मेथीचे दाणे खमंग भाजून कुटून पिठात मिक्स करा त्यामुळे मुठियाला खूप छान स्वाद येईल.
३. दुधी आणि गाजराच्या किसात मीठ आणि मसाले मिक्स केले कि लगेचच पीठ घालून मळून घ्या. खूप वेळ ठेवले तर दुधीला पाणी सुटून पीठ चिकट आणि खूप सैल होईल.
this is a very nice web site
ReplyDelete