Healthy yet tasty!
सर्व्हिंग: ४ ते ५ धिरडी
साहित्य:
१ १/२ कप मोड आलेले हिरवे मुग
१/२ कप भिजवलेली मुगाची डाळ
२ हिरव्या मिरच्या
३-४ काळी मिरी
मीठ चवीप्रमाणे
१/२" आल्याचा तुकडा (आवडीप्रमाणे)
शालो फ्राय करण्यासाठी तेल
कृती:
१. मोड आलेले मुग,मुगाची डाळ,मीठ,हिरव्या मिरच्या,मिरी आले आणि एक ते सव्वा कप पाणी घालून एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
२. मिश्रण खूप जड असेल तर आणखीन थोडे पाणी घालून किंचित पात्तळ करून घ्या. मिश्रण खूप साधारण मध्यम जाडीचे असू दे.
३. तेल घालून तवा गरम करा. आणि मोठ्या डावाने तव्यावर गोल मिश्रण ओता. धीरड्याला कडेनी जाळी पडलेली दिसेल. खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली कि, धिरडे उलटवून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्या. धीरड्याच्या बाजूनी गोलाकार चमचाभर तेल सोडा.
४. गरम गरम धिरडे कोथिंबीरीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
you can add information of this recipe with respect to nutritional importance as well.
ReplyDeletecan we use other than green moog?
ReplyDeletesuper... khup chhan...
ReplyDelete