१ कप गव्हाचं पीठ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१-२ पुदिन्याची पाने
१ टीस्पून तेल
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून हळद
पीठ मळण्यासाठी पाणी
सारणासाठी-
१७५ ग्रॅम पनीर
७-८ पुदिन्याची पाने
२ टीस्पून आलं लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट (१/२" आलं + ३ लसूण पाकळ्या+ २ हिरव्या मिरच्या)
१/२ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीप्रमाणे
पराठे भाजायला बटर किंवा तूप
पराठे लाटण्यासाठी तांदळाचं पीठ
१. गव्ह्याच्या पिठात हळद,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि १ टीस्पून तेल घालून एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून छान पोळीला लाटतो तितके मऊ पीठ मळून १-२ तास झाकून ठेवा.
२. पुदिन्याची पाने,आलं,लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून बारीक पेस्ट करून घ्या. पनीर हाताने कुस्करून पनीरचा चुरा करून घ्या. त्यात हि पेस्ट,चाट मसाला आणि मीठ घालून हाताने छान कालवून घ्या.
३. पराठे लाटायच्या आधी मळलेले पीठ पुन्हा एकदा नुसतेच मळून घ्या. पीठाचे ( २ १/२" आकाराचे) ४ समान गोळे करा. सारणाचे ४ समान भाग करा. हाताने वळून लाडवा सारखे ( २ १/२"-३") गोळे करून घ्या.
४. पिठाची ५" व्यासाची पुरी लाटून घ्या आणि मधोमध सारणाचा गोळा ठेवा. सारणाचा गोळा पुरीने सगळ्याबाजूनी झाकून बंद करा आणि तांदळाचं पीठ लावून ७"-८" व्यासाचा गोल पराठा अलगद लाटून घ्या.
५. तवा गरम करून बटरवर पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. गरम गरम पराठा रायत्या बरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!