दोडक्याच्या शिरांची तांबोळी -Dodkyachya Shiranchi Tamboli

तांबोळी हा मुळ सारस्वती पदार्थ आहे. दोडक्याच्या शिरांप्रमाणे पेरूची कोवळी पाने किंवा डाळींबाच्या झाडाची कोवळी पाने तसेच ओव्याची पाने वापरूनही तांबोळी करता येते. तांबोळी गरम भातावर सर्व्ह करण्याची पद्धत आहे त्याबरोबर सांडगे किंवा पापड सर्व्ह करावेत. दोडक्याची भाजी केल्यावर उरलेल्या शिरा (साले) फेकून न देता त्याची तांबोळी करता येते.

सर्व्हिंग: ३ते ४ माणसांसाठी

साहित्य:
पाव किलो दोडक्याच्या शिरा (साले)
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
३-४ मिरी
१ हिरवी मिरची
२ टीस्पून जिरे
१ कप दह्याचे ताक
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१. दोडकी धुवून त्याच्या; गाजराची साले काढतो तश्या शिरा काढून घ्या.
२. दोडक्याच्या शिरा,जिरे,मिरी आणि हिरवी मिरची कढईत ५-१० मिनिटे छान भाजून घ्या.
३. हे सगळे जिन्नस आणि ओलं खोबरं मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
४. त्यात मीठ,साखर आणि ताक घालून ढवळून घ्या आणि गरम भातावर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!