गोड शिरा (सत्यनारायण प्रसाद)- God Shira

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी 



साहित्य: 
१/२ कप बारीक रवा
१/४ कप पिकलेलं केळं, चिरून
१/२ कप साखर
 १ १/२ कप दुध
१/२ कप पाणी
१/२ कपापेक्षा किंचिंत कमी साजूक तूप
१ टीस्पून बदामाचे कप
२ टीस्पून बेदाणे
१/४ टीस्पून वेलचीपूड
चिमुटभर केशर

कृती:
१. कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
२. रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात केळं घाला आणि परता.
३. एकीकडे दुध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.
४. रव्यात बदामाचे कप,बेदाणे,वेलची पूड आणि केशर घालून परता.
५. उकळते दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा शिजून फुलून येईल.
६. गॅस बंद करा. त्यात साखर घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवा. वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी शिरा सर्व्ह करा.

11 comments:

  1. क्या बात.. क्या बात.. हा शिरा अप्रतिम असतो. आणि तो फार थोड़ा देतात. म्हणून या शि-यासाठी मी निर्लज्जपणे सत्यनारायणाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा हात पुढे करतो. आणि पुडीत दिला तर खिशात घालतो..मस्त पाककृति..

    ReplyDelete
  2. Hi
    tumchya recipess khup chan aani sopya astat mala jara sangal ka majha chanyacha pitacha pola khup oily hoto

    ReplyDelete
  3. धन्यवाद नचिकेत..
    हा शिरा माझा पण एकदम फेवरीट आहे :) लहानपणी मी पण पुन्हा पुन्हा मागून खायचे :)

    ReplyDelete
  4. thank you..
    chanyachya pithcha pola tayar vhayla tasa thoda vel lagto...tyamul tel kami padle ahe ase vatun tel jasti ghatle jate..varun zakan thevun varcha bhag vafevar shijvun ghya polyachya kada sutayla laglya ki pola ultavun punha chamchabhar tel ghala tyamule pola telkat honar nahi. polyache mishran madhyam jadiche theva.

    ReplyDelete
  5. कल्याणी ,असा जर रोज रोज चं मस्त मस्त खात गेली तर वजन कस कमी होईल ?

    ReplyDelete
  6. mala pan khup aavadto satynarayanacha prasad

    ReplyDelete
  7. thanks a lot
    u made my day very delicious.

    ReplyDelete
  8. Hi कल्याणी
    मी आज 1st time तुमच्या site वर visit केला आणि तुमच्या recipe इतक्या सुंदर आहेत कि त्यांना कॉपी करण्याचा मोह आवरू शकले नाही.
    पण इकडे कॉपी करण्याचा option नाहीये मी तुमच्या recipe कश्या कॉपी करू .

    ReplyDelete
  9. Khupach chan banto hya method ne banavla tar. mast measurement... aprateem sheera.. thank u

    ReplyDelete
  10. mala pan shira khup aawadt

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!