सर्व्हिंग: २ माणसांसाठी
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तूप
१ टीस्पून जिरे
२-३ हिरव्या मिरच्या,तुकडे करून
१ टीस्पून लिंबुरस
१ टेबलस्पून खवलेला नारळ
१ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१. रताळी स्वच्छ धुवून त्याची साले काढा. नंतर रताळी किसून घ्या.
२. पातेल्यात तूप गरम करा. तूप चांगले तापले कि, जिरे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.
३. मिरची पांढरी पडली कि लगेच रताळ्याचा कीस घालून परता. कीस आळून कमी झाला कि मग दाण्याचा कुट,मीठ आणि साखर घालून परता.
४. झाकण ठेवून १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. वरून खवलेला नारळ आणि कोथिंबीर घाला.
५. लिंबू रस घाला आणि एकत्र करून गरम गरम खायला द्या. तोंडी लावायला गोड दही द्या.
me nakii kayun bagayn
ReplyDeleteFinally I found this recipe. Thanks a lot.
ReplyDelete