Showing posts with label Beverages / पेये. Show all posts
Showing posts with label Beverages / पेये. Show all posts

Lemon-Honey Ice Tea with Mint Flavour


Read this recipe in Marathi
Serving : 2 to 3 persons





Ingredients:
1 lt. Water
3 tspn Tea powder
1/4 cup Honey
As per taste sugar
3 tbspn Fresh lemon juice
7-8 fresh Mint leaves
10-12 Ice cubes

Method:
1. Add sugar in the water and boil. Add tea powder and let it boil for a minute.
2. Drain tea and let it completely cool down.
3. Add lemon juice and honey. Mix well.
4. Add few mint leaves and  refrigerate for 3-4 hours.
5. Before serving add ice cubes in a tall glass, Pour tea on that .Garnish with lemon slice and mint leaves and serve chilled.

Tip: You can add grated  ginger instead of mint leaves, so that you can serve with another flvour.

आइस टी-Lemon-Honey Ice Tea with Mint Flavour

Read this recipe in English

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी 
 

 
 
 
साहित्य :
१ लिटर पाणी 
३ चमचे चहा पावडर 
१/४ कप मध 
चवीप्रमाणे साखर 
३ मोठे चमचे ताज्या लिंबाचा रस 
७-८ पुदिना पाने 
१०-१२ बर्फाचे क्युब्स  
 
कृती :
१.  पाण्यात साखर घालून पाणी उकळा. चहा पावडर घालुन पाणी एकदा मिनिट उकळून gas बंद करा.
२. चहा गळून घ्या आणि पूर्णपणे थंड होईपर्यंत थांबा.
३.  लिंबाचा रस आणि मध घालून  नीट  ढवळून घ्या.
४.  पुदिना पाने घालून ३-४ तास फ्रिज मध्ये ठेवा.
५.  सर्व्ह करताना ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालून वरून आइस टी ओता आणि मस्त एन्जॉय करा.

टिप: पुदिना पानांच्या ऐवजी आलं किसून घातलं तरी मस्त स्वाद येतो.


 

Plain Lassi

'A Refreshing coolant drink'
Read this recipe in Marathi
Servings: 2 persons

Ingredients:
1 1/2 cups thick yogurt (curd)
1/2 cup thick cream
1/4 tspn -1/2 tspn salt
sugar as per taste (approx 1/4 cup)
2-3 mint leaves for garnishing
1/4 cup water to adjust consistency (optional)

Method:
1. Blend together yogurt,cream,sugar and salt for 2-3 minutes. Add little water to adjust the consistency and blend it again.
2. Pour lassi into serving glass from a height so as to form a thick foam. Garnish with mint leaves. You can also add a spoonful thick cream (malai) on top.
3. Refrigerate for 2-3 hours and serve chilled.

लस्सी-Lassi

Read this recipe in English 
सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
१ १/२ कप जाडसर थंड दही
१/२ कप ताजी जाड मलई (फ्रेश क्रीम)
१/४-१/२ टीस्पून मीठ
साखर चवीप्रमाणे (अंदाजे १/४ कप)
सजावटीसाठी पुदिन्याची पाने

कृती:
१. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडर वर छान घुसळून घ्या.
२. लस्सी सर्व्हिंग ग्लास मध्ये फुटभर उंचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
३. त्यावर पुदिन्याची पाने घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.ग्लासमध्ये लस्सीवर चमचाभर मलई घातली तरी झक्कास लागतं!

टीप: लस्सी जाडच चांगली लागते पण किंचित पात्तळ करायची असेल तर थोडेसे गार पाणी घालून ब्लेंडरवर घुसळून घ्या.

Solkadhi ( Kokum kadhi)

Read this recipe in Marathi
Servings: 2 to 3 Persons 


Ingredients: 
2 cups fresh coconut milk
4-5 kokum
1 green chilly
1 tbspn coriander leaves chopped
1-2 garlic cloves (optional)
1 ½ tspn sugar
Salt to taste 

Method: 
1. Put fresh coconut chunks in the mixer or blender jar with 1cup water. Take a thin cotton cloth and put it on a bowl so that the edges are draped over the side. You will be pouring the blended milk into this thin-cloth and then squeezing it out.
Start the blender and make a puree. Pour it on the thin-cloth and squeeze out the milk. Use the same fiber for one more time. Repeat the procedure to pour required quantity of coconut milk.
2. If you are using readymade coconut milk then take 1 cup of canned coconut milk plus 1 cup of water, as the canned one is too thick than the fresh one.
3. Soak kokum in ¼ cup of water for 30-35 minutes so that you will get the essence of kokum. Drain kokum water after half and hour and add it to coconut milk.
4. Add sugar, salt and chopped green chilly, mix well. Add crushed garlic cloves. Garnish kadhi with chopped coriander leaves and serve chilled. 

Tip: Kokum kadhi is good for digestion. In konkan people generally prefer kokum kadhi with fish or any kind of non veg meals.

सोलकढी-kokum kadhi

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी


साहित्य :
ताज्या नारळाचं दुध २ कप 
४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
१-२  लसूण पाकळ्या  (Optional )
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे

कृती :
१. १ कप ताज्या खोब-याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या.
२. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.
३. नंतर साखर मीठ  घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला.लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार serve करा.

टीप: हि कढी पाचक असून नुसती प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते. कोकणात मासे किंवा चिकन-मटणचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.