कोल्हापुरी झणझणीत चिकन- Kolhapuri Spicy Chicken Curry

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी


साहित्य : 
५०० ग्रॅम चिकन
मॅरीनेट करण्यासाठी-
१ १/४ टीस्पून आलं-लसूण पेस्ट,१/२ टीस्पून हळद, मीठ, २ टेबलस्पून दही
वाटणासाठी मसाला- 
१ १/२ कप उभा चिरलेला कांदा, १/२ टीस्पून खसखस , २-३ काजू, ३-४ टीस्पून ओलं खोबरं,३ लवंगा, ६-७ काळे मिरी , १" दालचिनीचा तुकडा, १/२ टीस्पून शहाजिरे,१ टीस्पून धने
रश्यासाठी साठी -
१/२ कप बारीक चिरलेला कांदा,२ टीस्पून लाल तिखट,१ कप बारीक चिरलेला टोमॅटो
३ टेबलस्पून तेल

कृती:
१. चिकन २ ते ३ तास आधी मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
२. कोमट पाण्यात खसखस भिजवून ठेवा. वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी,काजू, धने,शहाजिरे,ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळं जिन्नस किंचित कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.
३. भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
४.नंतर वरील वाटण घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला.

५.दोन मिनिटाने चिकन घालून ते परता. बेताचे पाणी घालून ढवळा.
६. १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या.वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

टीप :
आवडी प्रमाणे रस्सा पात्तळ करा.

रस्सा अजून तिखट हवा असेल तर चव घेऊन लाल तिखटाचे प्रमाण वाढवा.
रेडीमेड आलं-लसूण पेस्ट न वापरता ताजी पेस्ट करावी याने चिकन जास्ती चवदार लागते .

5 comments:

  1. tondala pani sutala

    ReplyDelete
  2. How to make noodles which are in manchow soup.
    Can send receipe on my following email I.D
    (lamo@rediffmail.com)

    Thank You

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!