चिंच गुळाची आमटी-Chinch Gulachi Amti (Sweet and Sour Dal)

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी

साहित्य:
१/४ कप तुरीची डाळ
१ टीस्पून गोडा मसाला
१ १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१ १/४ टीस्पून किसलेला गुळ
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
५-६ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती: 
१. कुकर मध्ये डाळ मऊसर शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ डावाने चांगली घोटून घ्या.
२. डाळ घोटून त्यात गोडा मसाला,लाल तिखट,हळद,मीठ,चिंच आणि गुळ घाला.
३. पाणी घालून डाळ २-३ मिनिटे उकळा.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि कढीपत्ता पाने आणि हिंग घालून आमटीला वरून फोडणी द्या.

2 comments:

  1. Tried this today and it turned out to be really good :) thank you!

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!