जि-या मि-याची कढी-Jirya Miryachi Kadhi

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी 
साहित्य:
१/२ कप ओलं खोबरं
१ टीस्पून जिरे
६-७ मिरी
१/२ टीस्पून लाल तिखट
२ सोलं (आमसुलं)
५-६ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती: 

१. जिरे आणि मिरी खमंग भाजून कुटून घ्या.ओलं खोबरं आणि लाल तिखटा बरोबर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
२. त्यात सोलं , मीठ आणि १ कप पाणी घालून १०-१५ मिनिटे मुरवत ठेवा. म्हणजे सोलाचा अर्क उतरेल.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि कढीपत्ता पाने आणि हिंग घालून कढीला वरून फोडणी द्या.
५. गरम भातावर कढी वाढा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!