Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य:
४ टेबलस्पून कुळथाचं पीठ
१ १/२ कप पाणी
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
५-६ लसूण पाकळ्या ठेचून/ चिरून
४ टेबलस्पून ओलं खोबरं
१ १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल
कृती:
१. एका बाउल मध्ये कुळथाचं पीठ, चिंचेचा कोळ, लाल तिखट,मीठ पाण्यात घाला. हाताने कालवून एकजीव करा.
१. एका बाउल मध्ये कुळथाचं पीठ, चिंचेचा कोळ, लाल तिखट,मीठ पाण्यात घाला. हाताने कालवून एकजीव करा.
२. कढईत तेल गरम करा. लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा घालून परता.
३. २-३ मिनिटांनी बाउल मधले मिश्रण घाला. उकळी आल्यावर मिश्रण जाड होऊ लागेल.
४. ओलं खोबरं घालून ढवळा. झाकण ठेवून १ वाफ काढा आणि भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
faarach chhan
ReplyDelete