साहित्य:
१ कप कांद्याचे चौकोनी तुकडे
१/२ कप बटाट्याचे चौकोनी तुकडे
फ्लॉवरचे ५-६ तुरे
१/२ कप भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
१/४ कप मटार
१/२ कप पनीरचे चौकोनी तुकडे
४-५ लसूण पाकळ्या चिरून
मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून धणेपूड
१ १/४ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून आमचूर
मीठ
४ टेबलस्पून तेल
कृती:
१. साहित्यात दिलेला सगळा मसाला आणि मीठ एका वाटीत एकत्र करून घ्या. हा सगळा मसाला भाज्यांना लावून १०-१५ मिनिटे मॅरीनेट करून ठेवा.
२. खोलगट तव्यावर तेल गरम करून लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा फोडणीला घालून १-२ मिनिटे परतून घ्या.
३. नंतर बटाटा परता. मग उरलेल्या सगळ्या भाज्या आणि पनीर घालून परता. हि भाजी मोठ्या आचेवर (high flame) करावी.
४. ३-४ मिनिटे झाकण ठेवून भाज्या शिजू द्या. तळाला करपू नये म्हणून भाजी अधून मधून परतत रहा.तिखटपणा आणि मीठ चवीप्रमाणे वाढवावे.
५. हि भाजी पोळी किंवा पुलाव बरोबर सर्व्ह करा.
Amazing Website..!!! thanks for helping us with your recipes
ReplyDelete