सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१/४ kg पापलेट ( ३-४ तुकडे)
१ छोटा कांदा, बारीक चिरून
१/२ कप ओलं खोबरं
१/४ कप नारळाचं दुध
१/२ ते १ टीस्पून चिंचेचा कोळ
१ १/२ टीस्पून धने
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
कृती:
१. पापलेटच्या तुकड्यांना १/२ टीस्पून हळद,१/४ टीस्पून तिखट, मीठ आणि १/४ टीस्पून चिंचेचा कोळ लावून १ तास मॅरिनेट करून ठेवा.
२. १/४ कप बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं आणि धने मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात तेल गरम करा आणि १/४ कप कांदा फोडणीला घाला. ३-४ मिनिटे कांदा छान परतून घ्या. मग त्यात हळद तिखट आणि पापलेटचे तुकडे घालून परतून घ्या. झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
४. नंतर त्यात नारळाचं दुध, चिंचेचा कोळ घालून अलगद ढवळून घ्या. झाकण ठेवून थोड्यावेळ शिजवा.
५. वाटलेला मसाला घालून ढवळा. मीठ आणि ३/४ ते १ कप पाणी घालून ढवळा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे आमटी उकळत ठेवा. चव बघून गरज वाटल्यास अजून थोडे मीठ,चिंच किंवा तिखट घाला. उकळी काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर सर्व्ह करा.
टीप: माशाचे तकडे शिजले कि ढवळताना किंवा वाढताना तुटू शकतात त्यामुळे अलगद ढवळा.
पापलेटच्या ऐवजी हीच आमटी तुम्ही सुरमई किंवा कोलंबी घालून करू शकता.
पापलेट कधी पाव किलो घेऊ नका. खवैय्या पदवीचा अपमान होतो :P
ReplyDeleteSahi
DeleteHi Aakash,
ReplyDeleteहि गोष्ट मात्र अगदी बरोबर आहे. मी यापुढे नक्की लक्षात ठेवीन :)